कोंडवड येथे डॉक्टर प्रतीक चव्हाण यांचे शिवव्याख्यान

मुळ गोंडगाव गावचे सुपूत्र परंतु सध्या मफुकृवि.राहुरी येथे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्हयांचे संचालक विद्यार्थी कल्याण तथा संचालक राष्ट्रीय सेवा योजन( क्लास वन अधिकारी) म्हणून कार्यरत असलेले प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव दंतवैद्यकिय डाॅक्टर प्रतिक चौहान हे सुद्धा शिव व्याख्याता म्हणून    
 अहमदनगर जिल्ह्यात प्रसिध्द व्याख्याते म्हणून गोंडगावचे नाव कमवित आहेत .आज शिवांकुर विद्यालय कोंडवड राहुरी येथे शिवजयंती निमित्त शिवांकुर राहुरी विद्यालयात डाॅक्टर प्रतिक चौहान प्रमुख पाहुणे व शिवव्याख्याता होते व याप्रसंगी त्यांनी केलेले भाषण व पोवाडा सादरीकरणांची व्हिडीयो चित्रणाने त्यांननी उपस्थितांची मने जिंकून घेतलीत.या शिवजयंती उत्सवाला राहुरीचे आमदार तथा माजी मंत्री श्री प्राजक्त दादा तनपुरे सह उपस्थित शिवांकुर संस्थेचे प्रमुख डाॅ.प्रकाश पवार,खजिनदार डाॅ.किशोर पवार,संचालक श्री युवराज पवार,मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम , शिक्षक,शिक्षिका ,विद्यार्थी व कोढवड राहुरीचे सरपंचासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी डाॅ.प्रतिक चौहान यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन त्यांचे शिवव्याख्यान झाले.

( भडगाव तालुका प्रतिनिधी, सतीश पाटील )

0/Post a Comment/Comments