जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना अटक

वर्ध्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला रेशन दुकानदाराकडून 20 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्णराव सहारे याने देवळी येथील दुकानदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.

तडजोडित 40 हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. लाचलुचपत विभागाने रात्री सापळा रचून वर्ध्याच्या शासकीय विश्राम गृहात रंगेहात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. पुरवठा अधिकाऱ्याला लाच स्वीकारण्यास मदत करणाऱ्या ऋषिकेश रमेशराव ढोडरे खाजगी दलालाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकारी राहत असलेल्या विश्रामगृहाच्या खोलीत वेगवेगळ्या पाकिटात 5 लाख 60 हजार 360 रुपये मिळून आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे असणारी ही पाकिटातील रक्कम कशाची याची देखील पडताळणी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश सहारे आणि ऋषिकेश ढोडरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments