अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यात अनेक शाळा जीर्ण झाल्या आहेत. तर काही दहा-बारा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. मूर्तिजापूर तालुक्यातल्या धोत्रा शिंदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताच्या प्लॅस्टरचा मलबा काल रात्री कोसळला. या घटनेमुळे शाळा बांधकामाबाबत प्रश्न निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. पंचायत समिती अंतर्गत ग्राम धोतरा शिंदे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा रात्रीच्या वेळेस छताचे प्लॅस्टर कोसळले.
हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून चार वर्षीय बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
2017 मध्ये बांधकाम करण्यात आलेल्या या शाळेला सर्वत्र भेगा पडल्या आहेत. परंतु, शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असतं असा प्रश्नही पालकांकडून विचारला जात आहे.
अशा दुर्घटनांना जबाबदार कोण?
जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वाईट आहे. मजुरी करणारे लोकंही खासगी शाळांमध्ये आपली मुलं टाकत आहेत. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा दुर्घटना घडत आहेत. याचे कारण टक्केवारी असल्याचं बोलले जाते. बांधकामाचा दर्जा हा सुमार होतो. त्यामुळं अशा घटना घडतात.
विशेष म्हणजे या शाळेचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी झाले. सहा वर्षांतच या इमारतीच्या बांधकामाला भेगा पडल्याचे दृश्य दिसते. स्लॅब कोसळले तेव्हा रात्रीची वेळ होती. त्यामुळं दुर्घटना टळली. दिवसा स्लॅब कोसळला असता तर… या विचाराने पालक हैरानं झाले आहेत.
विद्यार्थ्यांचा जीव मुठीत
आपण आपल्या पाल्यांना शाळेत शिक्षणासाठी पाठवितो. पण, शाळा सुरक्षित नसेल तर कसं असा प्रश्न पालकांना पडला आहे. संबंधित बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. छोत्रा येथील शाळेचे छत कोसळले तसेच अशाप्रकारे शाळांचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा