अँकर:-जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील मेन रोडवरील राहुल एम्पोरियम या दुकानाला रात्री जवळपास एक वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गौरव सुरेश राखेच्या वय 30 यांच्या जळून मृत्यू झाला तर आग आग तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्याने लवकर लक्षात न आल्याने घरातील मंडळी ही झोपलेल्या अवस्थेत होती त्यात सुरेश राखेच्या व कविता राखीच्या यांना घरातून निघण्यात यश आले. यात कविता राखेच्या या जखमी झाल्या आहेत परंतु वरच्या मजल्यावर गौरव राखेच्या त्याची पत्नी मोना राखेच्या संकेत राखेच्या शुभम राखेच्या व गौरव च्या लहान बाळ असे चारही जन वरती रूममध्ये अडकून होते यात नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी सर्वात अगोदर शुभम राखेच्याला बाहेर काढण्यात यश आले.
व्हॉईस:-
तदनंतर संकेत राखेच्या व मोना राखेच्या व लहान बाळाला काढण्यात यश आले परंतु संकेत वरती अडकून आहे या विचाराने गौरव राखेच्या आपल्या पत्नीला सोडून परत वरती गेला असता आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने गौरवला हालचाल करणे सुद्धा कळाले नाही आणि गौरव मिळेल त्याकडे पळत गेला तर तिसऱ्या मजल्यावर बाथरूम मध्ये तो लपून बसला येथे आग लागणार नाही म्हणून बाथरूम हे सुरक्षित ठिकाण आहे असे समजून त्याने बाथरूम मध्ये बसला परंतु आगीचे गोळे एवढे भयानक होते की त्या बाथरूम पर्यंत आग पोहल्याने गौरव तिथंच गुदमरून आपले सोडून दिले तद नंतर गौरव वर आगीने गौरवला घेरले होते आगीत गौरव च्या 90% जळून खाक झालेला होता यावेळी गल्लीबोळातील नागरिकांनी नागरिकांनी नागरिकांनी अथक परिश्रम करून सर्वांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केले परंतु आगीत अखेर गौरव चा मृत्यू झाला आणि पूर्ण परिसरात एकच कळा व हाहाकार झाला गौरवला टोपण नाव म्हणून हसमुख असे म्हटले जात होते आगीत नगरपालिका कर्मचारी बडगुजर संकेत राखेच्या आधी जखमी झाले आहेत तर घराचे व दुकानाचे पूर्ण साहित्य जळून खाक झाले अशी घटना चोपडा शहरात पहिल्यांदाच झाली असावी असा कायास बांधला जात आहे आगीच्या वेळेस एपीआय अजित साबळे व त्यांचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रास भाई गुजराती संचालक नेहमीचं जैन राजूभाऊ बिटवा अजय भाऊ राजपूत सागर नेवे मयंक जैन निर्मल बोरा आदींनी मदत केली.
( सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी )
टिप्पणी पोस्ट करा