जिल्ह्यातील तेवीस ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी दिला आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका झाल्या. राखीव जागांवर ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुका लढल्या आणि निवडून आले त्यांना एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाने दहा मे 2022 रोजी परिपत्रक काढून वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढ 17 जानेवारी 2023 पर्यंत केली होती.
परंतु एवढा कालावधी मिळून सुद्धा सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी एचपी तूमोड यांनी सदस्यांना अपात्र घाेषित केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र साधारण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ग्रामपंचायत (/ 2014 / प्र. क्र. 159 / पं. रा. -2 दिनांक 4 ऑगस्ट 2016) नुसार अपात्र घोषित केले आहे.
यात मोताळा तालुक्यातील जवळपास 23 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. यात काही सदस्य सरपंच सुद्धा आहेत. एकाच ग्रामपंचायतीचे तीन-तीन सदस्य सुद्धा यात अपात्र करण्यात आले आहेत.
मोताळा तालुक्यातील अपात्र सदस्य
श्रीमती वंदना तानाजी जाधव ग्रामपंचायत घुसर बुद्रुक
मुकेश परमसिंग पवार ग्रामपंचायत धामणगाव देशमुख
अनुसयाबाई धनराज धाबे ग्रामपंचायत धामणगाव देशमुख
तहारे गांगु ईश्वरसिंग ग्रामपंचायत इब्राहिमपूर
विलास भागचंद मंझा ग्रामपंचायत कुऱ्हा
बबीता शेन्सिंग पेळे ग्रामपंचायत कुऱ्हा
काशीराम शेजराम मंझा ग्रामपंचायत कुऱ्हा
वर्षाबाई संदीप घोती ग्रामपंचायत कुऱ्हा
बबीता जगन्नाथ साबळे ग्रामपंचायत कुऱ्हा
सुमन नारायण बर्डे ग्रामपंचायत मोहेगाव
नटवरलाल सुंदरलाल जाधव ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ
सरस्वती दयाराम नाईक ग्रामपंचायत पिंपळगाव नाथ
रेखा भास्कर गायकवाड ग्रामपंचायत शेलापुर खुर्द
पुष्पाबाई आनंदा उमाळे ग्रामपंचायत शिरवा
दिनेश भिका घोती ग्रामपंचायत तरोडा
अनुप सिंग देव सिंग येरवाळ ग्रामपंचायत तरोडा
सुषमा रामनाथ कटारे ग्रामपंचायत तरोडा
अनिता दीवालसिंग धीरबस्सी ग्रामपंचायत तरोडा
धरासिंग रावसिंग मंझा ग्रामपंचायत तरोडा
शिल्पा विकास बस्सी ग्रामपंचायत तरोडा
एकनाथ जोरसिंग जाधव ग्रामपंचायत तरोडा
आशा रमेश जाधव ग्रामपंचायत तरोडा
अन्नपूर्णा महादेव जुनारे ग्रामपंचायत वरूड
टिप्पणी पोस्ट करा