रावेर पंचायत समिती शौचालय भ्रष्टाचार प्रकरण 2आरोपींचे जामीन फेटाळले

रावेर पंचायत समिती शौचालय भ्रष्टाचार प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपी लेखाधिकारी लक्ष्मण पाटील आणि समाधान निंभोरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे.
त्यामुळे आता दोघांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

महाराष्ट्रभर गाजलेला रावेर पंचायत समितीचा बहुचर्चित शौचालय भ्रष्टाचार प्रकरणावर एक महत्त्वाची अपडेट रावेर पोलिसांकडून मिळालेली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान निंभोरे तसेच रावेर पंचायत समितीचे लेखाअधिकारी लक्ष्मण पाटील यांनी भुसावळ कोर्टात जामीन साठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे.
 शौचालय प्रकरणातून रावेर पोलिसांनी 68 लाख रुपये या प्रकरणात वसूल करण्यात आले आहे.
लवकरच बाकी आरोपींची अटकसत्र राबविले जाईल असे तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments