ऐतिहासिक भव्य धम्म पद्ययात्रेचा आज 15 फेब्रुवारी रोजी दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप .

महाकारुनी तथागत भगवान गौतम बुद्ध'
 यांचा पवित्र 'अस्थि धातू कलश' समवेत थायलंड चे 110 भंतेगण सोबत दि.17 जानेवारी पासुन परभणी ते चैत्यभूमी दादर अशी निघालेली आह ऐतिहासिक भव्य धम्म पद्ययात्रेचा आज 15 फेब्रुवारी रोजी दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप .
आजपर्यंत च्या इतिहासात भारतात गौतम बुद्ध यांच्या अस्थि महाराष्ट्रातील परभणी मध्ये आणि परभणी ते चैत्यभूमी पर्यंत च्या शहर-गावखेड्यातील अनुयायांना त्या अस्थि दर्शनासाठी आणण्याचा बहुमान हा सिध्दार्थ भाऊ हत्तीअंबीरे यांनी मिळवला आहे.
आणि या पदयात्रे दरम्यान आलेल्या हजारो अडचणींना सामोरे जाउन,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे "भारत बौध्दमय" करण्याचे स्वप्न उराशी बाळगुन हे धम्म चक्र गतिमान करण्यासाठी सिध्दार्थ भाऊ प्रयत्न करत आहेत.
या ऐतिहासिक धम्म पद्ययात्रेचे मुख्य आयोजक "सिध्दार्थ भाऊ हत्तीअंबीर यांचे सकल बौद्ध बांधवांच्या वतिने खुप खुप आभार...


0/Post a Comment/Comments