रेशन दुकानांवर OTP बंद झाल्याने अडचणी

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांवर 'ई-पॉस' मशिनद्वारे संबंधित कार्डधारकांचे प्रमाणीकरणासाठी थंब घ्यावे लागते.

मात्र, अनेकांच्या अंगठ्याचे ठसे निटपणे येत नाही. यामुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे.

गेल्या महिन्यात सुरू झालेली 'ओटीपी' सिस्टम पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेशन दुकानधारांनी केली आहे.

रेशन दुकानावर धान्य वितरणकरताना रेशन कार्डामध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांना आधार सिंडींग आवश्‍यक आहे. जेणेकरून घरातील कोणीही एक जण आल्यास त्याचा आधार क्रमांक टाकून लागलीच धान्य देणे सोपे जाते. 


त्यासाठी त्यांचा अंगठाही घ्यावा लागतो. मात्र, रेशन घेणारे अनेक जण कष्टांची कामे करतात. त्यात त्यांच्या अंगठ्यावरील रेषा दिसेनाशा होतात. एकदा घेतलेला थंब पुन्हा उमटत नाही. थंब जुळण्यासाठी तासन्‌तास प्रयत्न करावा लागतो. यात वेळ वाया जातो अन्‌ धान्यवाटप रखडते.

मागील महिन्यात शासनाने थंब येत नसेल, तर घरातील कोणाचाही मोबाईल क्रमांक एकदा 'ई पास' मशिनमध्ये फिड करून तो मोबाईल धान्य घेताना आणला, तर त्या मेाबाईलवर जो 'ओटीपी' येईल तो टाकल्यास लागलीच धान्य वाटपाचा मार्ग मोकळा केला होता. ओटीपी सिस्टीमध्ये थंबची गरज नसते.

ओटीपीमुळे वेळ वाचतो अन्‌ धान्याचे वाटपही लवकर होते. यामुळे शासनाने धान्य वितरण करताना पुन्हा ओटीपी सिस्टीम सुरू करावी, अशी मागणी जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.

0/Post a Comment/Comments