भारत राष्ट्र समितीच्या नांदेडमध्ये होत असलेल्या 5 फेब्रुवारी 23 रोजी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या सभेसाठी सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते.
की तेलंगणा मध्ये शेतकऱ्यांसाठी तसेच महिला व बेरोजगार तरुणांसाठी राबवलेल्या योजना त्यात प्रामुख्याने, 24 तास विज पुरवठा, शेतीसाठी मोफत पाणीपुरवठा, खरीप आणि रब्बीसाठी दरवर्षी 5000 रुपये एकरी भागभांडवल, शेतीसाठी मोफत
पाणीपुरवठा,5 लाखाचा विमा, शेतमालाच्या शेवटच्या कनापर्यंत हमीभावाने शेतमाल खरेदी अशा अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवुन शेतकयांना खऱ्या अर्थाने सुखी करणारा यशस्वी प्रयोग तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे एक व्यासपीठ म्हणून भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली आहे व त्याची पहीली सभा घेन्याचा मान महाराष्ट्रातील नांदेड येथून मिळनार आहे.
या सर्व बाबीच्या अनुषंगाने याम्ही आपणास आवाहन करतो की, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर व धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव व शेतकरी चळवळीतील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी, न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सर्वांना सभेस येण्याचे नम्र आवाहन उत्तर महाराष्ट्र समन्वय समिती मुख्य नेते –नानासाहेब बच्छाव यांनी केेले आहे .
टिप्पणी पोस्ट करा