पत्रकाराला शिवीगाळ व धक्काबुक्की

तासखेडा ता. रावेर येथील वीट भट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबी द्वारे अवैध माती उत्खनन झाले असून वृत्तांकन करीत असताना जेसीबी मालक शुभम विकास पाटील रा. तासखेडा ता. रावेर जि . जळगाव यांनी पत्रकार अनिल इंगळे तासखेडा चे 
 वार्ताहार यांना शिवीगाळ करून यांचे कडील चित्रीकरण करीत असलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेत.

 त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली असून त्यांचे जीवास काही एक बरे वाईट झाल्यास सदर व्यक्ती जबाबदार राहील.

लघु पाटबंधारे यांच्या असलेल्या जमिनीवर अवैधरित्या माती उत्खनन करण्यात आलेले असून त्याच प्रकारे अशा अवैध माती उत्खनन तसेच अवैद्य गौण उत्खननाच्या घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असून महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित जेसीबी मालक यांचेवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी.

संबंधित प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व तसा कारवाई अहवाल देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन पत्रकार संरक्षण समिती ग्रामीण यांनी तहसीलदार रावेर यांना दिले आहे.

0/Post a Comment/Comments