याप्रकरणी 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. तर, मुळशी येथील उरवड्याचे तलाठी संजय दाते याला अटक करण्यात आली असून कोतवाल अमित भंडलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान घडला.
अधिक माहिती अशी, की फिर्यादी यांनी माहिती अधिकारातील (Mulshi) कागदपत्र देण्याची विनंती उरवड्याचे तलाठी संजय दाते यांच्याकडे केली असता, राज्य शासनाचा विनाशुल्क कागदपत्रे देण्याचा नियम असूनही दाते याने 2000 रुपयांची मागणी केली. तडजोड अंती 942 रुपयांची मागणी केली. या प्रकरणी फिर्यादीने पौड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करून पुणे लाचलुचपत विभागाने तलाठी याला अटक केली.
टिप्पणी पोस्ट करा