आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले असून राज्याचे मुख्य आदिवासी विकास भवन असलेले नाशिक येथील आदिवासी विकास भवनाला सोमवारी सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी घेराव घालत उलगुलान आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे यला मिळाले. अखिल भारतीय महाराष्ट्र आदिवासी विकास परिषदचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक घेऊन शांतपणे आपल्या मागण्या प्रशासनांसमोर मांडल्या. या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना बोलावून घेत त्यांच्या मागण्यांबाबत प्रत्येक मुददयावर चर्चा केली तसेच या मागण्यांबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचे लेखी खुलासा करण्यात आल्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढण्याचा इशाराही यावेळी लकी जाधव यांनी दिला. आंदोलनामुळे आदिवासी भवनसमोर गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाल्याचे यला मिळाले.
या आहेत मागण्या
आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे
पंडित दीनदयाल स्वयंम योजनेख लाभ मिळावा
महाविद्यालयानी एक महिन्यात शिष्यवृत्ती जमा करावी
डीबीटी योजनेचा लाभ वेळेवर मिळावा
शासकीय वसतीगृहांच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी.
पेसा पदभरती करण्यात यावी.
मोठया शहरांमध्ये लोकसेवा, केंद्रिय लोकसेवा
आयोगाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करावे.
टिप्पणी पोस्ट करा