ही घटना आज बुधवारी सकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या जवळ घडली आहे. या अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी काय आहे घटना?
तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या पुढे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने बसला धडक दिली. यात एमएच१९ सीवाय ५२७२ क्रमांकाच्या डंपने एमएच १३ सीयू ६९३१ क्रमांकाच्या बसला धडक दिली. या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बसचे चालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख ( रा. वरणगाव ) तसेच वाहक (कंडक्टर) प्रितीमा शांताराम अहिरे ( रा. भुसावळ) यांच्यासह सुनील बाबूराव काजनेकर (उमापूर); बाबूराव दामोदर ठोसर व यमुनाबाई बाबूराव ठोसर ( रा. चिंचखेडा बुद्रुक ); गणेश रामकृष्ण कोळी (रा. पारंबी): इस्माईल खॉ इम्रान खॉ; सुधाकर नारायण अहुळकार ( रा. पारंबी ); निवृत्ती सापुर्डा ढोण; व शुभांगी तुषार अहुळकार यांचा समावेश आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा