आदिवासी आश्रमशाळा पिंपरखेड येथे पौष्टीक तृणधान्य जनजागृती व इफको मार्फत ब्लँकेट वितरण कार्यक्रम संपन्न.
कृषी विभाग भडगाव व इफको कंपनी यांचे वतीने कै.विमलताई उत्तमरावजी पाटील आदिवासी आश्रम शाळा पिंपरखेड ता भडगाव येथे प्रजासत्ताक दिनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य जनजागृती व विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
कृषी विभागाचे वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी सुरू असून पौष्टिक तृणधान्याचा आहारातील वापर वाढावा, पौष्टिक तृणधान्याचे आरोग्य विषय गुणधर्म जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत व पालकांपर्यंत पोहोचावेत तसेच पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढावे या उद्देशाने जनजागृती पर कार्यक्रम सुरू आहेत त्यानुसारच आदिवासी आश्रम शाळा पिंपरखेड येथे निवासी शाळेत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला सदर वेळी पौष्टिक तृणधान्य ज्वारी , बाजरी, वरई, राळा, भगर, राजगिरा यांच्या विविध आरोग्य विषयक माहिती फलकांचे प्रदर्शन लावण्यात आलेले होते तसेच सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना व शिक्षकांना बाजरी मिनी किट व भाजीपाला मिनी किट चे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट लेझीम प्रात्यक्षिक करून आपल्यातील कलागुणांची चुणूक दाखविली. सदर कार्यक्रमात इफको कंपनीचे वतीने आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मदत म्हणून सामाजिक योजनेअंतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी व स्पर्धा निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमधील कलात्मक सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी गुणवत्ता निकषावर प्रत्त्येक वर्गातील प्रत्येकी प्रथम पाच विद्यार्थ्यांना एकूण ५० ब्लँकेट चे वितरण इफकोचे क्षेत्रीय व्यवस्थापक केशव शिंदे साहेबांच्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कै. विमलताई उत्तमरावजी पाटील आदिवासी आश्रम शाळेच्या सचिव रजनीताई सनेर मॅडम या उपस्थित होत्या. तसेच मार्गदर्शक म्हणून इफको कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी केशव शिंदे साहेब व तालुका कृषी अधिकारी भडगाव श्री.भगवान गोर्डे साहेब उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री.गोर्डे यांनी रोजच्या आहारात पौष्टीक तृणधान्याचे, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये पोषणमूल्यांचे कमतरतेमुळे असलेले विविध आजार व त्यांवरील उपाय तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ संकल्पना आणि महत्व याविषयी सखोल माहीती दिली.
इफको कंपनीच्या केशव शिंदे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात इफको कंपनीचा इतिहास, कंपनीची वाटचाल, शेतकऱ्यांसाठी कंपनीचे असलेले विविध प्रॉडक्ट व सामाजिक दामित्व म्हणून इफको कंपनी मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रमांची यावेळी माहिती देवून आदिवासी शेतकरी बांधवांच्या सर्व मुलांनी । शिक्षण येऊन पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमास पंचायत समिती कृषी अधिकारी ईश्वर देशमुख, मंडळ कृषी अधिकारी भडगाव श्री.उत्तम जाधव, कृषी सहाय्यक सुखदेव गिरी,प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक के आर पाटील व ए ए पाटील सर, प्रगतिशील शेतकरी रवींद्र पाटील , प्रमोद माळी, गावातील ज्येष्ठ नागरिक रोहिदास हेलिंगे यांचेसह शेतकरी, सर्व शालेय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक सुखदेव गिरी,सचिन पाटील,अमोल सोनवणे यांनी मेहनत घेतली.
( प्रतिनिधी , सतीश पाटील ) गोडगावं ता.भडगाव
टिप्पणी पोस्ट करा