मनीष चौधरी जवानाचा दिल्ली येथे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन.

वाडे येथील मनीष चौधरी जवानाचा दिल्ली येथे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन. शहिद जवानावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. 
भडगाव वार्ताहर — तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व दिल्ली फरीदाबाद येथे ( सीआयएसएफ ) सेंट्रल इंडस्टीृयल सेक्युरीटी फोर्स मध्ये देशसेवा बजावत असलेले जवान कै. फौजी मनोज लक्ष्मण चौधरी वय ३५ वर्ष यांचे दिल्ली येथे उपचार घेत असतांना दुखद निधन झाले. ही घटना दि. २२ रोजी राञी ८ वाजता दिल्ली येथे घरीच घडली. हे जवान डयुटीवर असतांना शहिद झाले. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. या जवानाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दिल्लीहुन विमानाने औरंगाबाद येथे मृतदेह आणणार आहेत. औरंगाबादहुन वाडे गावी अँम्बुलन्सने या जवानाचा मृतदेह आणणार आहेत. दि. २४ रोजी वाडे येथे वाघळी रस्त्यालगत शेतात या जवानाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनासह नातेवाईक मंडळींकडुन मिळालेली आहे. वाडे येथे तरुण मंडळी, ग्रामस्थांमार्फत अंत्यसंस्कारासाठी नियोजन सुरु आहे. शहिद जवान मनीष चौधरी हे वाडे येथील रहिवाशी व जि. प. विभागाचे सेवानिवृत्त लिपीक लक्ष्मण ओंकार चौधरी यांचे लहान चिरंजीव होतं.मनीष चौधरी हे जवान सी आय एस एफ मध्ये ९ वर्षापुर्वी दिल्ली येथे भर्ती झाले होते. ते दिल्ली फरीदाबाद येथे सध्या सेवा बजावत होते. दि. २२ रोजी राञी ८ वाजेच्या सुमारास जेवण करुन थोडा आराम करुन फरीदाबाद येथे डयुटीवर जाणार होते. तोच क्रुर काळाने त्यांचेवर घाला घातला. अचानक ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मनीष चौधरी या जवानाचा जागीच मृत्त्यु झाल्याची दुखदायक घटना घडली. त्यांना दिल्ली येथील दवाखान्यात नेले असता डाॅक्टरांनी मयत घोषीत केले. या दुर्दैवी मृत्युने वाडे परीसरात शोककळा पसरलेली आहे. दि. २३ रोजी सकाळी दिल्ली येथुन शवविच्छेदन करुन विमानाने मृतदेह औरंगाबाद येथे आणणार आहेत. औरंगाबाद येथुन अँम्बुलन्सने मृतदेह वाडे गावी आणणार आहेत. दि. २४ रोजी सकाळी ९ वाजता वाडे गावालगत वाघळी रस्त्याला लागुन शेतात या जवानाच्या पार्थीवावर अंत्यसस्कार शासकीय इतमामात केले जाणार आहेत. येथे तरुण मंडळी ओटा बांधकाम करतांना दिसुन आले. गावात तरुण मंडळी, ग्रामस्थ अंत्यसंस्काराच्या पुर्वतयारी, नियोजनकामी लागलेले आहेत. गावात शहिद जवानाचे बॅनर झळकत आहेत. अंगणांमध्ये रंगी बेरंगी रांगोळया साज सजावटीचेही नियोजन सुरु आहे. या जवानाच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, ३
वर्षाची मुलगी असा परीवार आहे. अंत्यसंस्कारासाठी भडगाव पोलीस स्टेशनमार्फत पोलीस बंदोबस्त लावलेला आहे.

प्रतिनिधी ,सतीश पाटील ( गोंडगाव ता. भडगाव  )

0/Post a Comment/Comments