फलका अभावी धावतात एसटी बस... प्रवाशी त्रस्त


साखरखेर्डा येथून धावणार्‍या अनेक बसेसांना (ST Buses) मार्ग फलक नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून चालकास एसटी बस कोठे चालली असे विचारण्याची ही सोय राहिली नाही .


असा प्रत्यय साखरखेर्डा बसस्थानकावर आला आहे.


साखरखेर्डा हे गाव आडवळणी असले तरी लोकसंख्या 20 हजार आहे . येथून सकाळी औरंगाबाद , जालना , खामगाव , अकोला , बुलढाणा येथे जाण्यासाठी बसेस (ST Buses) असतात . काही बसला फलक असतात आणि चालक प्रवाशांची सौजन्याने वागतात . 

तर काही बसला मार्ग फलकच नसतात. त्या बसेस कोठे चालल्या , मार्ग कोणता असा प्रश्न प्रवाशी विचारतात . त्या प्रवाशांसोबत माणूसकी दाखवत बस कोठे चालली यांची सूचना वाहक आणि चालक देतात . तर काही चालकांना प्रवाशी म्हणजे डोके दुखी वाटत आहे .


31 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता किनगावजजट्ट येथून अकोला जाणारी खामगाव आगाराची बस क्रमांक एम एच 40 8783. साखरखेर्डा बसस्थानकावर आली . एकतर बस 15 मिनीटे लवकर आली . त्यात कोठे चालली हा मार्ग फलक बसमध्ये असून चालकाने लावला नव्हता . 

त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. काही प्रवाशांनी बस कोठे चालली असे विचारले असता चालक बोलायला तयार नाही . काही प्रवाशांनी दार वाजवून विचारले तर चालक म्हणाला दिसत नाही का वाचता येत नाही का अशी प्रश्र्नांची सरबत्ती करुन प्रवाशांना अवमानित करत आहेत . अशा चालकास आगार प्रमुखांनी बडतर्फ करुन घरी पाठवावे . आणि प्रवाशांशी सौजन्याने वागनार्‍यांनाच सेवेत ठेवावं अशी तंकार आणि विनंती प्रवाशांनी खामगाव आगार प्रमुख आणि बुलढाणा आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.


0/Post a Comment/Comments