या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविक देवस्थानावर नवस मानत मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. दरम्यान, कोरोनाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्ष ही यात्रा नियमात पार पडली होती. परंतु आता कुठलेही निर्बंध नसल्याने यात्रोत्सवास पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. अनेक वर्षापासून असलेल्या अट्रावल-भालोद येथील जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहे. या यात्रोत्सवास २३ जानेवारीपासून प्रारंभ होत असल्याने यात्रोत्सवात व्यावसायिकांनी मोठ्या उत्साहाने दुकाने थाटले आहे.
परिवहन मंडळातर्फे बसची सुविधा
गेल्या तीन पिढ्यापासून देवस्थानाची देखभाल कोळी पंच मंडळी करीत आहे. माघ शुद्ध अमावस्या ते माघ शुद्ध पौर्णिमापर्यंत दर सोमवार व शनिवार यात्रोत्सव असतो. परिवहन मंडळाकडून भुसावळ, यावल, जळगाव, फैजपूर व इतरत्र ठिकाणाहून बसेस सोडल्या जातात. तसेच खाजगी रिक्षाही उपलब्ध असतात. दरम्यान, भाविकांसाठी २० बसेस राज्य परिवहन महामंडळाकडून यावल, रावेर व चोपडा या तीन आगारातून २० विशेष अट्रावल यात्रोत्सवासाठी सेवा देतील. यात्रेत गर्दी वाढल्यास बसेसची संख्या अजून वाढणार आहे.
मनोरंजनाची साधने उपलब्ध
यात्रेचे निमित्त जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बर्हाणपूर, खंडवा व इतरत्र ठिकाणाहून खेळणी, पाळणे, सर्कस इतरत्र खेळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. दर्शनाबरोबरच मनोरंजनाची साधनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मोठ-मोठे विविध स्टॉल येथे सजवून लावलेले असतात.
दरम्यान, यात्रेचे यंदा पाच वार मुंजोबा मंदिरात २३ जानेवारीला सोमवारी पाहिला वार, २८ जानेवारी (शनिवार) दुसरा, तर यात्रेचा तिसरा वार ३० जानेवारीला आहे. यात्रेचा चौथा वार ४ फेब्रुवारी व पाचवा वार ५ फेब्रुवारीला (पौर्णिमा) राहणार आहे.
अग्नीडाग पहावयास मिळतो
या ठिकाणी तीन देवस्थान आहेत. यात पहिले संतोषी मातेचे, मनुदेवीचे व मुंजोबा असे मंदिर आहेत. तसेच पोलीस यंत्रणा देखील सतर्क असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. यात्रा झाल्यानंतर येथे असल्याने याठिकाणी अग्निडाग पहावयास मिळतो. त्याचप्रमाणे आजू-बाजूच्या खेड्यागावातून याठिकाणी लोक वर्गणी जमा करुन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडला जातो. या प्रसादाचा लाभ परिसरातील भाविक मोठ्या आनंदाने घेत असतात.
टिप्पणी पोस्ट करा