ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या चौकशीचे अखेर जिल्हा परिषदेचे आदेश

तालुक्यातील उटखेडा येथील तत्कालीन ग्रामसेवक व हल्ली ग्रामपंचायत विवरे ॥ खु।। येथील ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या कामकाजा बाबत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
( ग्रां .प .) अनिकेत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ग्राम विकास अधिकारी तथा तालुका ग्रामसेवक संघटनेचा सचिव अतुल पाटील याने १४ वा वित्त आयोगाचा सन २०२१-२०२२ चा निधी खर्च करताना कामे मजूरच न लावताच करून दाखविल्याचा विक्रम केल्याची बाब तक्रारदार शेख नजमुद्दीन शेख मुनिर यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीत उघड झाल्याने तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती, त्यास अनुसरून अतुल पाटील याच्या कामकाजाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी, प स रावेर यांना देण्यात आले आहेत.पंचायत समिती प्रशासन आता याबाबत जिल्हा परिषदेला नेमका काय अहवाल पाठवते की अतुल पाटील याची पाठराखण करते,हे येत्या काही दिवसात कळेल.तक्रारदार मात्र सहा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहे

0/Post a Comment/Comments