वाळूची चोरटी वाहतूक सुरूच; पोलिसांनी पकडले ट्रॅक्टर

जळगांव:- तालुक्यातील सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर शुक्रवार (ता. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तालुका पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सावखेडा शिवारातील मराठी शाळेजवळ वाळूची चोरटी वाहतूक करणारे विनाक्रमाकांचे ट्रॅक्टर पकडले. 

चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी एक ब्रॉस वाळूसह ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत नितीन किसन कुंभार (रा. पिंप्राळा, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे तपास करीत आहेत.


---------------------------------------------------
---------------------------------------------------


निधन वार्ता

कमलबाई धनराज सोनवणे
गोडगाव ता.भडगाव येथील रहिवाशी व जय बाबाजी परिवारातील सदस्य कमलबाई धनराज सोनवणे यांचे नुकताच वय वृद्धपण काळाने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे पंचवंडे असा मोठा परिवार आहे.
 ते बांधकाम व्यवसायिक रमेश कारागीर व अशोक कारागीर यांच्या आई तर विकास सोसायटीची माजी. चेअरमन धनराज देवचंन सोनवणे यांच्या धर्मपत्नी होत्या

0/Post a Comment/Comments