रावेर ता. रावेर जि. जळगाव दी.०८/०६/२०२३ रोजी झालेल्या वादळी नुकसानाची शासकिय तसेच पिकविम्याची भरपाई अद्याप सुध्दा न मिळाल्या बाबत.
आम्ही शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य,शाखा रावेर तालुका तरफ आपणास नम्र निवेदन देतो की,
दी.०८/०६/२०२३ रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तसेच पाऊसमुळे रावेर तालुक्यातील बऱ्याचश्या शेतकऱ्याच्या केळी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. त्यापैकी काही शेतकरी विमीत आहेत व काही बिगर विमित आहेत. अद्याप पावेतो विमित अगर बिगर विमित शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून अगर शासना कडून कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी सदर प्रकरणात लक्ष घालून तालुक्यातील पीडित शेतकरयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देवून न्याय द्यावा ही विनंती सदर निवेदन द्वारे करण्यात येत आहे.
तरी विनंती की,
सदर शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा सदर शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. असे निवेदन तहसीलदर साहेब यांना दिले.
रावेर तालुकाध्यक्ष – ऍड.एन.के.महाजन
रावेर तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच सावखेडा–युवराज कराड
टिप्पणी पोस्ट करा