या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली पोलिसांनी शांततेने नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत दोषींवर कठोर कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलवला.
10 जानेवारी सकाळी साडेसहा वाजता विरावली गावाजवळ संशयित आरोपी तथा ट्रॅक्टर चालक खलील रफिक तडवी (कोरपावली ता. यावल)याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अरुण किशोर भालेराव
या तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.
जखमेवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू ओढवला.
त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी शनिवारी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल होऊन कारवाईच्या मागण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला
पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्यासह कठोरकारवाईचे आश्वासन दिल्यानंतर युवकावर कोरपावली येथे शोकाकुल वातावरणत अत्यंत संस्कार करण्यात .सत्यवान युवराज भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कॉन्स्टेबल किशोर परदेशी करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा