लाच भोवली ! अडावद येथील पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर जाळ्यात

 
चोपडा:- एकीकडे जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूची सर्रासपणे चोरटी वाहतूक सुरु असून यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाहीय.

अशातच वाळूचे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणादणले आहे.

नेमकं काय आहे प्रकार?

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांकडून चार हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटी वाळू वाहतूक करण्यासाठी ही लाच मागितली होती.

दरम्यान, वाळू वाहतूक करण्यासाठी कोणतीही कारवाई करून नये यासाठी अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी याने पंटरच्या माध्यमातून ४ हजाराची लाच मागितली होती.

त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. याची सत्यता पडताळणीसाठी जळगावच्या एसीबी पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी सापळा रचून अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गोसावी आणि खासगी पंटर चंद्रकांत कोळी यांना पकडले आहे.

0/Post a Comment/Comments