स्थानिक ग्रामपंचायत च्या मार्फत बोगस ठराव करीत कामे करून शासनाचा निधी लूट करण्याचा कारभार सुरू व शिक्षकांची गैरहजेरी !

यावल पंचायत समितीद्वारे झालेल्या विविध कामांची चौकशी व्हावी या मागणीसाठी निळे निशाण सामाजिक संघटने चे आमरण उपोषण सुरू

 यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पातळीवरील अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे गावामध्ये स्वच्छ भारत मिशन या अभियानाचा फज्जा उडवला असून.

स्थानिक ग्रामपंचायत च्या मार्फत बोगस ठराव करीत कामे करून शासनाचा निधी लूट करण्याचा कारभार सुरू असून या गैरकारभाराच्या विरोधात निळे निशान सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमरण उपोषण सुरू केले आहे.

तसेच काही शाळा मध्ये शिक्षक गैरहजर राहिल्याने मुलांना शिक्षणा पासून वंचित राहावं लागत. असल्याने 
अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई व्हावी व विकास कामांमध्ये भोंगळ कारभार करणाऱ्यांवर कठोर करवाई व्हावी  असे उपोषणकर्ते निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांचे म्हणणे आहे .


0/Post a Comment/Comments