फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालय समोर यावल रावेर तालुक्यातील सावकार ग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा ताबा पावती मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे.

फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालय समोर यावल रावेर तालुक्यातील सावकार ग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा ताबा पावती मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे.

 या उपोषणा मध्ये 12 सावकार ग्रस्त शेतकरी बंधू तर आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्या च्या पत्नींचा समावेश आहे.
यावर रावेर तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्यांच्या पोटात मोठे भीतीचे सूळ उभे राहिले आहे.

सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी फैजपुर प्रांताधिकारी कार्याला समोर उपोषण सुरु केले आहे.

या उपोषणामध्ये 12 सावकार ग्रस्त  शेतकरी  आहे तर काही आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचा सहभाग आहे .

जोपर्यंत शेतीचा ताबा पावती मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा पावित्रा या उपोषणकर्त्यांनी  घेतला आहे .
या उपोषणकर्त्यांमध्ये पुंडलिक नथू चौधरी, निलेश धनसिंग पाटील, निलेश रमेश चौधरी, सुनील अर्जुन जावळे, श्रीकृष्ण दामू पाटील , सोपान शामराव पाटील,राजेंद्र भास्कर पाटील ,रवींद्र भागवत जावळे, दिलीप रविदास पाटील , उषाबाई टोपा जंगले, आशाबाई रवींद्र पाटील ,सिमाबई चंद्रकुमार फेगडे , भारती अनिल परदेशी यांचा समावेश आहे .
 आता उपोषण कर्त्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो .
याकडे रावेर आणि  यावल तालुक्याच लक्ष लागलं आहे. नुकतेच या ठिकाणी  उपोषण कर्त्यांची वैद्यकीय तपासणी देखील न्हावी ग्रामीण रुग्णालचे  डॉ कौस्तुभ तळेले ,नयन दांडगे,रितेश ठाकरे,नवीन कोळी यांच्या वतीने तपासणी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments