निळे निशाण सामाजिक संघटनेची रावेर - यावल तालुक्याची संयुक्त बैठक संपन्न

निळे निशाण सामाजिक संघटनेची रावेर - यावल तालुक्याची संयुक्त बैठक संपन्न
      दि .२१/०१/२०२३ शनिवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेची रावेर - यावल तालुक्यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह रावेर येथे घेण्यात आली .
     बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर होते जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम , जळगाव जिल्हा महिला मंच प्रमुख किर्तीताई तायडे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरूवात करण्यात आली .
    त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अतिक्रमित , बेघर - भुमीहिन , शेतमजुर , बेरोजगारी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व गोरगरिबांच्या समस्या जाणून घेतल्या व बैठकीत शरद बगाडे यांची रावेर तालुका नियोजन समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली .
    रावेर तालुका महिला मंच कार्यकारणी गठीत करण्यात आली रावेर तालुका महिला मंच प्रमुखपदी विदयाताई बाविस्कर , सरचिटणीस पदी कविताताई शिंदे , उपाध्यक्षपदी अश्वीनीताई अटकाळे , उपाध्यक्षपदी शारदाताई बेलदार , उपाध्यक्षपदी लक्ष्मीताई कोळी , कार्यध्यक्षपदी नलुताई सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली . त्याप्रसंगी रावेर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , उपाध्यक्ष संजय तायडे , उपाध्यक्ष अनिल धनगर , रावेर तालुका युवक उपाध्यक्ष विलास तायडे , रावेर तालुका युवक संपर्कप्रमुख विक्रांत तायडे , रावेर तालुका युवक प्रसिद्धीप्रमुख कुंदन तायडे , रावेर शहर युवक प्रमुख प्रकाश अडकमोल , यावल तालुका उपाध्यक्ष इकबाल तडवी , यावल तालुका संपर्क प्रमुख दिपक मेढे व तसेच रावेर - यावल तालुक्यातील असंख्य महिला - पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

0/Post a Comment/Comments