सावकारग्रस्त शेतकरी मरणासन्न स्थितीत पण शासनाची टोलवा टोलवी व्यवस्थित.

सावकारग्रस्त शेतकरी मरणासन्न स्थितीत पण शासनाची टोलवा टोलवी व्यवस्थित.

सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्यांच्यासाठी बनवलेल्या महाराष्ट्र राज्य सावकारी ( नियमन ) अधिनियमांच्या माध्यमातून न्याय मिळाला एवढेच नाही तर त्यांचे नावाने शासनाने जुन्या नोंदी रद्द करीत नवीन नोंदी बनवत सातबारा उतारे प्रधान केले .
 पण?

केवळ उतारे नावाने करून काही भागणार नाही त्या जमिनीचे ताबा आणि ताबे पावती देणार कोण?
प्रशासनाच्या केवळ या खात्याकडे अधिकार त्या खात्याकडे अधिकार अशी गोंधळ निर्माण करणारी स्थिती तयार झाली आहे.

त्यात माझा शेतकरी भरडला जातोय व हक्कासाठी उपोषण करणाऱ्या या सावकारग्रस्त शेतकऱ्यांना ज्या वेदना होत आहेत त्याचे सोयर सुतक मात्र कोणताही नाही.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र त्यांचे अधिकाऱ्यांच्या गोंधळात शेतकऱ्यांची किंमत शून्य वाटत आहे.
पण?
आता सर्व शेतकऱ्यांचे सहनशक्तीच्या पलीकडे जात असल्याचे वाटते.
 सर्व अधिकारी वर्गाने एकत्र बसून निर्णय घ्यावा ज्यात सहकार महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून सहकार अधिकाऱ्यांसमोर महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांचे संरक्षणात ताबा आणि ताबा पावती मिळावी.

 अशी अपेक्षा असताना मा. जिल्हाधिकारी स्तरावरून अधिकारी वर्गांना प्रधिकृत न करता आणि ठोस निर्णय न घेता व शेतकऱ्यांनी त्री सदस्य समितीला सादर केलेल्या अर्जास न पाहता .

दिनांक 27/01/ 2023 रोजी मा.  जिल्हा उप निबंधक साहेब यांना मा अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेले पत्र शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ फेक नाही काय  ?

उपोषणाचे ठिकाण उपविभागीय अधिकारी साहेब  फैजपूर यांच्या कार्यालयाच्या समोर पत्रात नमूद जिल्हा अधिकारी साहेब जळगाव येथे.
याचाच अर्थ असा की त्रि सदस्य समितीला सादर केलेले पत्रात नमूद अपेक्षांचा विचार न करता मोघमपणे उत्तर देऊन शेतकरी वर्गात पद्धतशीरपणे टाळले जात आहे.

 आणि सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना उपोषणा स्थळी केवळ आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून व्यवस्थित सहकार्य आहे.
 मात्र महसूल प्रशासन मात्र धिम्म असून प्रत्यक्ष भेट न घेता शेतकऱ्याला टाळले जात आहे.
 आज उपोषणा स्थळहून तीन महिलांना जळगाव येथे  सिव्हिल  हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रशासनाने या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसते की प्रशासन त्यांच्या मरणाची वाट बघत आहे?

असा प्रश्न शेतकरीग्रस्तांना पडला आहे आता तीन महिलांची तब्येत खालावल्याने यावल रावेर तालुक्याचे लक्ष उपोषणकर्त्यांकडे लागले आहे. सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल का असा प्रश्न रावेर यावल तालुक्यातील शेतकरी ग्रस्तांना पडला आहे.
 

0/Post a Comment/Comments