यावल तालुक्यातील हिंगोणा येथील महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणांसोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग म्हणून येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाट्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला.

यावल तालुक्यातील हिंगोणा येथील महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणांसोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग म्हणून रावेर तालुक्यातील सावदा कोचुर, न्हावी, फैजपूर ,चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील  बौद्ध वस्तीवर लाट्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला.



रावेर तालुक्यातील सावदा कोचुर, न्हावी, फैजपूर ,चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील  बौद्ध वस्तीवर लाट्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला.
 जवळपास 60 ते 70 लोकांनी अचानकपणे भाड्य हल्ला केल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली. यात अनेक जण जखमी झाले. असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. 


अशुतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला दहा ते अकरा टाके बसलेले असून ,रोहित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 /12/ 2022 रोजी. सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद येथील बौद्ध वस्तीवर 1)ललित सुनील वाणी २)भूषण नेमाडे पूर्ण नाव माहित नाही. ३) चेतन सोनवणे . ४)प्रशांत सोनवणे . ५)हेमंत दिलीप पाटील सर्व राहणार न्हावी तालुका यावल. ६)भास्कर चौधरी. ७) गणेश उर्फ देवा देवकर राहणार सावदा तालुका रावेर. ८)कल्पेश पाटील . ९)सुनील संतोष चिमणकर. १०) पवन सुतार सर्व राहणार कोचुर तालुका रावेर. ११)भूषण जाधव. १२)नीरज झोपे.१३) रितेश चौधरी.१४) शिवम बाविस्कर राहणार सावदा. १५)इंद्रजीत पाटील. १६)मयूर भारंबे.  १७)शुभम भारंबे सर्व राहणार फैजपूर तालुका यावल. व त्यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 जणांनी हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये आशुतोष अशोक भालेराव वय 21 वर्ष तसेच रोहित उर्फ बुभा मधुकर लोखंडे वय २० वर्ष दोघे राहणार भालोद हे गंभीर जखमी झाले .


यापैकी रोहित लोखंडे यांची प्रकृती चिंताजनक असून ते जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्यामध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग मनात आल्याने वरील जातीयवादी मानसिकतेच्या मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाट्या - काठ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून अनेकांना जखमी केले यात रोहित लोखंडे याला डोक्याला मारहाण करून गंभीर दुखापत करून हे थांबले नाहीत तर हे महारडे खूप जास्त मातले आहेत यांना धडा शिकवावा लागेल अशी जातीय वाचक शिवीगाळ करून फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी त्यांनी लाट्या काठ्यांनी मारहाण केली.
 यांची मुजोरी इथवर थांबली नाही तर ज्या महिला आपल्या मुलांना ज्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यांनाही मारहाण करून त्यांच्यासोबत अश्लील वर्तन केले.
 आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी त्यांच्या हातातील कोणत्यातरी हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून सदरचे भांडण सोडवण्यासाठी आलेले साक्षीदार सुलभा मधुकर लोखंडे ,उज्वला अशोक भालेराव, संगीता रुपेश भालेराव यांना सुद्धा वरील आरोपी त्यांनी लाथा बुक्क्यांनी  मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारून सुलभा मधुकर लोखंडी चे ब्लाउज फाडून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.


 वरील गुन्हा संदर्भात भरपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध र. नं. 224 /2022 भा.द.वि. कलम 143, 147, 148, 149, 326, 324, 354, 323, 337, 504 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार  प्रतिबंधक कायदा 2016 चे कलम तीन 3 (1) ( r) ( s) ( 3) (1) (w)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments